गोपनीयता धोरण
हे धोरण https://scholarship.mpsckeeda.com (Scholarship Keeda — Mpsckeeda चा शिष्यवृत्ती सराव उपक्रम) साठी आहे. शेवटचे अद्यतन: 17 नोव्हेंबर 2026.
चाचण्या
चाचणी सोडवण्यासाठी खाते लागत नाही. चाचणी सुरू करताना विचारलेले विद्यार्थ्याचे नाव व जिल्हा फक्त तुमच्या ब्राउझरमध्ये (localStorage) जतन होतात; ते आमच्या सर्व्हरवर पाठवले जात नाहीत. तुमचे निवडलेले पर्याय व गुणही फक्त तुमच्या ब्राउझरमध्येच राहतात.
मुलांची गोपनीयता
ही वेबसाइट शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. आम्ही फोन नंबर, ईमेल, पत्ता किंवा पेमेंट माहिती मागत नाही. कृपया नावाच्या जागी पूर्ण पत्ता किंवा फोन नंबर लिहू नका.
जाहिराती
सध्या या साइटवर बाह्य जाहिरात कोड नाही; फक्त Mpsckeeda ॲपचे बॅनर दिसतात. भविष्यात Google AdSense किंवा तत्सम जाहिराती सुरू झाल्यास हे धोरण अपडेट केले जाईल.
बाह्य दुवे
Mpsckeeda ॲप (Google Play), टेलिग्राम, WhatsApp शेअर, test.mpsckeeda.com व परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळांचे दुवे आहेत. त्यांची स्वतःची गोपनीयता धोरणे लागू होतात.
संपर्क
गोपनीयतेबाबत प्रश्न असल्यास टेलिग्राम चॅनेल @mathsbysachinsir1 वर निरोप द्या.